कुष्ठरोग निर्मूलनामध्ये  पालघर अव्वल

कुष्ठरोग निर्मूलनामध्ये पालघर अव्वल

पालघर, ता. २९ (बातमीदार) ः कुष्ठरोग निर्मूलनात पालघर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनी येथे कुष्ठरोग वैद्यकीय अधिकारी डीएनटी पथक आणि वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षकीय कुष्ठरोग पथक यांची कार्यशाळा, तसेच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालघरला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करणे, रुग्णांना शारीरिक व्यंग येण्याचे टाळणे, कुष्ठरोग रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक उपचार चांगल्या पद्धतीने करणे या बाबी पालघर जिल्ह्यात योग्य पद्धतीने करण्यात आल्या. पालघर जिल्ह्याचे सहायक कुष्ठरोग निर्मूलन संचालक डॉ. संदीप गाडेकर, कुष्ठरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सुरळकर यांनी कुष्ठरोगाबद्दल जनजागृती कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवला. त्यामुळे वार्षिक मूल्यांकनात पालघर जिल्हा अव्वल आला आहे. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय पर्यवेक्षक विजय इंगळे, विवेक सूर्यवंशी व सांख्यिकी सहायक विजय महाजन यांनीदेखील त्यांच्या क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. सर्व पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com