गॅस दरवढीविरोधात महिलांचा मोर्चा

गॅस दरवढीविरोधात महिलांचा मोर्चा

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) ः धुणीभांडी करणाऱ्या, भाजीपाला विक्री करणाऱ्या, फेरीवाल्या महिलांनी सिद्धांत जनसेवा संस्थेच्या पुढाकाराने गॅस दरवाढीविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. घरगुती गॅसच्या किमती अर्ध्या किमतीवर आणाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. मोदी सरकारला मतदान केल्याचा पश्चाताप होत असल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली.

‘अच्छे दिन येणार’ अशी स्वप्न दाखवून हे सरकार केंद्रात आणि राज्यात आले. मात्र, सर्वसामान्य माणसाला महागाईच्या कचाट्यातून सोडवू शकले नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे कठीण होऊन बसले आहे. घरगुती गॅससारखी अत्यावश्यक गोष्टदेखील ३०० रुपयांवरून ११०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आम्हा गोरगरीब महिलांना आपले घर चालवणे अशक्य झाले आहे, अशी तक्रार महिलांनी केली. सरकारने महिलांना बस प्रवासात सवलत दिली; परंतु रोजच्या जगण्यात महत्त्वाचा असणारा घरगुती गॅस महाग आहे. त्यामुळे याचे दर तात्काळ कमी करावेत, अन्यथा हा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संस्थेच्या सचिव वैशाली कांबळे यांनी व्यक्त केली आहे. या मोर्चात वैशाली कांबळे, वंदना भोईर, कमल जाधव, विमल सोनवणे, संगीता उज्जैनकर, सुनीता देशमुख, इंदुबाई पावशे, विमलबाई पवार आणि बहुसंख्य महिला सामील झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com