रेल्वेच्या सात कर्मचाऱ्यांना 
महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

रेल्वेच्या सात कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

मुंबई, ता. १० : कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या सात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांच्याकडून गौरव करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील दोन, नागपूर विभागातील तीन आणि पुणे तसेच भुसावळ विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यास ‘महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार’ प्रदान केला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मार्च महिन्यात कर्तव्यादरम्यानची सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात संरक्षेची खात्री करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि दोन हजार रोख यांचा समावेश आहे.
मुंबई विभागाचे वरिष्ठ विभाग अभियंता रवींद्र शांताराम चौधरी यांनी ६ मार्चला कर्तव्यावर असताना ईएमयूच्या नियमित देखभालीदरम्यान, तुटलेल्या वेल्डिंगमुळे एका डब्याची बोगी झुकलेली आणि मध्यवर्ती पिव्होट ब्रॅकेट लटकत असल्याचे लक्षात आले. कोच ताबडतोब नादुरुस्त असल्याचे चिन्हांकित करण्यात आले आणि चौधरी यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली; तर मुंबई विभागाचे ट्रॅक मेंटेनर अशोक कुमार यांनी २१ मार्चला ड्युटीवर असताना, पनवेल-रोहा विभागातील नियमित तपासणीदरम्यान, डाऊन लाईनवर किमी १४३/६-८ येथे एक तुटलेली फिश प्लेट दिसली. अशोक कुमार यांनी ताबडतोब ट्रॅकचे संरक्षण केले आणि येणाऱ्या तेजस एक्स्प्रेसला थांबण्याचे संकेत दिले. सर्व संबंधितांना तात्काळ कळवण्यात आले आणि ट्रेन सुखरूपपणे निघून गेली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे ‘महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार’ देण्यात आला आहे. याशिवाय नागपूर विभागाचे गार्ड रोशनसिंग सेंगर, लाईनमन कमल रामदास चौकीदार, लोको पायलट निशांत पागे, पुणे विभागाचे सहायक लोको पायलट अजित कुमार गुप्ता, कीमन शिवशंकर कुमार यांनाही पुरस्कार देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com