विलेपार्ल्‍यात आंबा महोत्‍सव सुरू

विलेपार्ल्‍यात आंबा महोत्‍सव सुरू

जोगेश्वरी, ता. १० (बातमीदार) ः कोकणातील देवगड आणि रत्नागिरीच्या अस्सल हापूसची चव मुंबईकरांना चाखता यावी, रास्त दरात आंबे मिळावेत, यासाठी कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे विलेपार्ले पूर्वेतील सुभाष रोडवरील लक्ष्‍मीनारायण लॉनमध्‍ये ९ ते १९ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. आंबा महोत्सवाचे उद्घाटन रविवारी (ता. ९) सायंकाळी आमदार पराग अळवणी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या वेळी माजी नगरसेविका सुनीता मेहता, अभिजीत सावंत उपस्‍थित होते. दरम्‍या,न विनोद तावडे यांनीही या आंबा महोत्‍सवाला भेट दिली.
कोकणातील प्रसिद्ध आंब्‍याबरोबरच काजू, कोकम, आवळा, करवंद आदी अस्‍सल कोकणी मेव्‍याचे ३५ स्टॉलही या महोत्सवात मांडण्यात आले आहेत. हा ‘आंबा महोत्सव’ थेट शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित असून कोकणातील अनेक आंबा शेतकरी एकत्र करून दरवर्षी हा महोत्सव भरवत असतात. यात आंबा उत्पादक आपल्या बागेतील आंबा थेट विक्रीसाठी महोत्सवात आणतात, यामुळे आंबाप्रेमी नागरिकांना अस्सल हापूस आणि पायरी आंबा खरेदी करण्याची संधी प्राप्त होते.

कोकण प्रतिष्‍ठानचे उपक्रम
कोकणातील शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांनी पिकवलेले उत्‍पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावे यासाठी महोत्सव भरवण्‍यात येतो. तसेच शेतकऱ्यांसाठी कृषी उभ्‍यासदौरा, कृषी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर, कृती गट सभा, सामुदायिक शेती, कोकण महोत्‍सव, मत्‍स्‍यशेती, फळप्रक्रिया असे अनेक उपक्रम कोकण प्रतिष्‍ठानकडून राबवण्‍यात येत असतात. आंबा महोत्‍सवाचे यंदाचे १८ वे वर्ष आहे.

यंदा दुबार पडलेली थंडी यामुळे पहिला मोहोर गळून पडला, तसेच नैसर्गिक प्रक्रियेत रोगाचा प्रादुर्भाव त्‍यामुळे केवळ ३५ टक्‍के उत्‍पादन झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्‍यांना उभारी देण्‍यासाठी मुंबईकरांनी जास्‍तीत जास्‍त या आंबा महोत्‍सवास भेट द्यावी.
- राजेंद्र तावडे, सचिव, कोकण प्रतिष्ठान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com