तुर्भे स्थानकात पाण्याची नासाडी

तुर्भे स्थानकात पाण्याची नासाडी

घणसोली, ता. १० (बातमीदार)ः तुर्भे रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून फलाटावर चालणाऱ्या प्रवाशांचा पाय घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईच्या विकासात सिडकोचा मोठा वाटा आहे. मात्र, स्वनिर्माण केलेल्या वास्तूंकडे सिडको दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांची झालेली दुरवस्था त्याचेच मोठे उदाहरण आहे. अनेक दिवसांपासून नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांमधील विविध समस्यांमुळे विळखा लागल्याचे चित्र आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी अजूनही नागरिकांना पाण्याचा तुटवडा होत असून तुर्भे रेल्वेस्थानकात होणाऱ्या पाण्याच्या गळतीकडे सिडकोने डोळेझाक केली आहे. नवी मुंबईतील प्रत्येक रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सिडकोने पिण्याच्या पाण्यासाठी काही टाक्या बसवल्या आहेत. तुर्भे रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे फलाटावरून चालणाऱ्या प्रवाशांचा पाय घसरण्याची शक्यता आहे.
-------------------------------------------------
अनेक दिवसांपासून तुर्भे रेल्वेस्थानकावर असलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे, याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
- राहुल पाटील, प्रवासी
--------------------------------------------------
तुर्भे रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी करून दुरुस्ती करण्यात येईल.
- दीपक सिंग, सिडको अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com