मिसळ महोत्सवाचा बदलापूरकरांकडून आस्वाद

मिसळ महोत्सवाचा बदलापूरकरांकडून आस्वाद

बदलापूर (बातमीदार) : शहरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर वर्षभर अनेक महोत्सव, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. इंडिया एक्स्पो आयोजित बदलापुरातील खवय्यांसाठी महापर्वणी ठरेल, अशा महामिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घोरपडे मैदान, जुना कात्रप रोड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा विविध विभागांतील मिसळचा आस्वाद खवय्यांना या ठिकाणी घेता येईल. मिसळ वडे, घावणे मिसळ, मिसळ ताट असे अनेक प्रकार पाहायला व चाखायला मिळत आहेत. या मिसळ महोत्सवात खवय्यांचे मनोरंजन व्हावे याकरिता, महाराष्ट्राची संस्कृती जपत, महाराष्ट्राची लोकधारा, कोळीनृत्य, लावणीनृत्य, फुगडी, मंगळागौरचा बहारदार नजराणाही सादर करण्यात आला आहे. उद्यापर्यंत (ता. ११) चालणाऱ्या या महोत्सवाला बदलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com