ज्येष्ठ चित्रकार पर्शराम सुतार यांचे चित्र प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीत

ज्येष्ठ चित्रकार पर्शराम सुतार यांचे चित्र प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीत

मुंबई, ता. १० ः सुप्रसिद्ध चित्रकार पर्शराम सुतार यांचे ‘डिव्हाईन एक्स्प्रेशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे ११ ते १७ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन त्यांच्या पत्नी शैला सुतार यांच्या हस्ते होणार आहे.
पर्शराम सुतार यांचे चित्रकलेचे शिक्षण जे जे स्कूल ऑफ आर्ट इथून पूर्ण झाले आहे. ते आपल्या चित्रातून प्रामुख्याने समृद्ध भारतीय वारसा आणि सांस्कृतिक परंपरांचे चित्रण कलात्मक पद्धतीने करतात. भारतातील असंख्य वारसा स्थळातील सौंदर्य लेणे हा त्यांच्या चित्रांचा विषय असतो. भारतीय समाजात प्रचलित असलेल्या सांस्कृतिक, धार्मिक प्रतीकांना ते कॅन्व्हासवर जिवंत करतात. पर्शराम यांनी प्रस्तुत प्रदर्शनात प्रामुख्याने ॲक्रॅलिक रंगात काम केले आहे. यामध्ये त्यांनी पंढरपूर, अजिंठा येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्‍वाच्या वास्तूंमधील अनेक चित्रविषय घेऊन चित्रनिर्मिती केली आहे. पर्शराम यांची अनेक चित्रे रिझर्व्ह बँक, नेहरू सेंटर आणि देश, परदेशातील ग्राहकांच्या संग्रहात आहेत. भारत तसेच इतर देशांतही त्यांची प्रदर्शने आयोजित झाली आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी येथील प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुले आहे.

चित्रकलेचे वैशिष्‍ट्य
समृद्ध भारतीय वारसा आणि सांस्कृतिक परंपरांचे कलात्मक चित्रण
भारतातील वारसा स्थळांतील सौंदर्य लेणे हा चित्रांचा विषय
प्रचलित सांस्कृतिक, धार्मिक प्रतिकांना कॅन्व्हासवर उतरवतात
ॲक्रॅलिक रंगातील चित्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com