डहाणूरोड रेल्वे स्थानकात मुंबई सेंट्रल-भुसावळ गाडीला थांबा

डहाणूरोड रेल्वे स्थानकात मुंबई सेंट्रल-भुसावळ गाडीला थांबा

डहाणू, ता. १० (बातमीदार) : डहाणू रोड रेल्वेस्थानकात मुंबई सेंट्रल-भुसावळ हॉलिडे स्पेशल रेल्वे गाडीला शनिवार (ता. ८) पासून थांबा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित, नगराध्यक्ष भरत सिंग राजपूत यांच्या प्रयत्नाने डहाणू रोड रेल्वेस्थानकात थांबा देण्यात आला आहे. डहाणूवासीयांतर्फे शनिवारी या गाडीला पंचारती ओवाळून तिचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी हिरवा झेंडा दाखवून सिग्नल दिल्यावर गाडी मार्गस्थ करण्यात आली. मुंबई सेंट्रल-भुसावळ हॉलिडे एक्स्प्रेस ०९०५१- ०९०५२ ही गाडी मुंबई सेंट्रलवरून रात्री ११.४० मिनिटांनी सुटून ती डहाणू रोड रेल्वेस्थानकात रात्री १.५४ मिनिटांनी पोहचणार आहे. या कार्यक्रमाला नगरसेवक जगदीश राजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com