परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 
केडीएमटीचा मदतीचा हात

परीक्षार्थी विद्यार्थ्यांना केडीएमटीचा मदतीचा हात

कल्याण, ता. १० (बातमीदार) : कल्याण, डोंबिवली शहरातील विविध केंद्रांत महाविद्यालयीन आणि शालेय परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने विशेष बस फेऱ्या चालू केल्याने उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे.

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षार्थींच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटीच्या विशेष बस फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या. यामुळे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या उत्पन्नात काहीशी वाढ झाली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांसाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात प्रत्येकी १८ बस सोडण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा विद्यार्थी वर्गाला झाला आहे. १ मार्च ते ३१ मार्च या महिन्याच्या कालावधीत १३१ विद्यार्थ्यांनी पास काढत प्रवास केल्याने त्यातून ४२,७५० रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.

परीक्षा काळात केडीएमटीने विशेष बससेवा दिल्याने मला त्याचा फायदा झाला. यामुळे आगामी काळात या बससेवा सुरू ठेवाव्यात.
- महेश सटाळे, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com