भिवंडीत ऑनलाईन जुगार 
खेळणाऱ्या चौघांना अटक

भिवंडीत ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : शहरातील इस्लामपुरा परिसरातील ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा टाकून भोईवाडा पोलिसांनी चार जणांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑनलाईनच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांतील माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

धामणकर नाका येथील अजंठा कंपाऊंडजवळ एका लूम कारखान्याच्या गाळ्यात संगणकावर ऑनलाईन जुगार खेळला जात होता. याची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी सदर जुगार अड्ड्यावर शनिवारी (ता. ८) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत उमेश साधूशरण गुप्ता (वय ३०), आतिक रहमान अन्सारी (३८), ध्रुव मानसुखलाल मालदे (३०), तामिल शहामोहमद फारुकी (वय ३४, सर्व रा. भिवंडी) यांना ऑनलाईन जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन संगणक आणि दोन हजार ६०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्यांच्याविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com