भाईंदरमध्ये तीन दिवसीय गोकथेचे आयोजन

भाईंदरमध्ये तीन दिवसीय गोकथेचे आयोजन

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : विश्व हिंदू परिषदेच्या गो परिषद संचालित केशवसृष्टी गोशाळेच्या वतीने तीन दिवसीय गोकथेचे आयोजन करण्यात आले आहे. भाईंदर पश्चिम येथील राधेशाम ग्राऊंड येथे १४ ते १६ एप्रिलदरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. १४ एप्रिलला गीता नगर येथील सालासर बालाजी मंदिर येथून कलश यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा राधेशाम ग्राऊंड येथे समाप्त होईल व त्यानंतर साध्वी आराधना गोपाल सरस्वती गोकथा सांगणार आहेत, अशी माहिती केशवसृष्टी गोशाळेचे कार्यवाह डॉ. सुशील अग्रवाल यांनी दिली. केशवसृष्टी गोशाळा गेल्या २४ वर्षांपासून गोसेवा, गोरक्षण व गोसंवर्धनाचे काम करत आहे. त्याचबरोबर दूध, दही व गोबर यापासून विविध औषधे व प्रसाधने तयार करण्याचे काम करत आहे. तसेच शेतकऱ्यांना गोआधारित शेतीसाठी प्रोत्साहित करुन शेतीची गुणवत्ता तसेच उत्पन्न वाढीसाठी प्रशिक्षित करत आहे. लम्पी आजारादरम्यानही मिरा-भाईंदर शहरातील सुमारे १५०० गायींचे मोफत लसीकरण केशवसृष्टी गोशाळेकडून करण्यात आले होते, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com