झोपडपट्टी पुनर्वसनात ५०० चौरस फुटांचे घर

झोपडपट्टी पुनर्वसनात ५०० चौरस फुटांचे घर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडीधारकांना ५०० चौरस फुटांचे घर द्या, २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधारकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता द्या, असा निवडणूक अजेंडा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाचा मेळावा चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात काल पार पडला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार या वेळी उपस्थित होते.
‘आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप- रिपब्लिकन- शिवसेना महायुतीचा विजय निश्चित आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास भाजपचा महापौर आणि रिपब्लिकनचा उपमहापौर होईल. ५ वर्षांत पहिली अडीच वर्षे उपमहापौर रिपब्लिकनचा आणि दुसरी टर्म उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल,’ असा विश्वास आठवले यांनी या वेळी व्यक्त केला. निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांना रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणायचे असून भाजप शिवसेनेने रिपब्लिकनच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आठवले यांनी केले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी ५ वर्षांत पहिला उपमहापौर रिपब्लिकनचा होईल, असे आश्वासन दिले.
...
विविध ठराव मंजूर
गेल्या २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या झोपडीधरकांच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात यावी. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ५०० फुटांचे घर देण्यात यावे. खासगी इमारतींना कालमर्यादा गुणवत्ता यासाठी रेरा प्राधिकरण आहे, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ही गुणवत्ता आणि इमारती बांधण्यासाठी निश्चित कालमर्यादा पाळणासाठी रेरासारखे प्राधिकरण असावे, मुंबईत बंजारा भवन; कक्कया भवन बांधावे आदी ठराव या मेळाव्यात मंजूर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com