Mumbai Corona
Mumbai CoronaSakal Digital

कोरोना रुग्णसंख्या वाढली! मुंबईत महापालिका रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती करण्यात आली आहे. रुग्णालयातील सर्व कर्मचारी, रुग्ण, अभ्यागतांना मास्क लावणे सक्तीचे केले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही मास्क लावण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी करणार असून रुग्णालयातील कोविड चाचण्या, वैद्यकीय प्राणवायू, औषधसाठा आदींबाबत आढावा घेतला. त्या वेळी मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यात कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व रुग्णालये तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी कोरोना उपचारांसाठी सज्ज राहावे, अशी सूचना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केली आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली, तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे, परंतु महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये कर्मचारी, रुग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना मास्क लावणे सक्तीचे असेल, असे आदेश चहल यांनी या वेळी दिले.

पालिका प्रशासन सज्ज-
१. कोरोना नियंत्रणासाठी महापालिका प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. महापालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये खाटा, ग्लोव्हज्, मास्क, पीपीई किट्स, औषधसाठा, वैद्यकीय ऑक्सिजनसह अन्य वैद्यकीय सामुग्रीची आवश्यकता असल्यास खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
२. सर्व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्राणवायू निर्मिती यंत्रणा कार्यरत आहेत का, ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा सुयोग्य आहे का, याचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे. नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉररूम) तातडीने कार्यरत राहतील, याची खबरदारी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com