पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वार्डन

पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वार्डन

खारघर, ता. १० (बातमीदार) : खारघर सेक्टर ३४ आणि शीघ्र कृती दलसमोरील सिग्नलवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळित झाली आहे.
मुंब्रा-बायपास रेतीबंदरजवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे जेएनपीटी/ कळंबोलीकडून मुंब्राकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे शीघ्र कृती दलाच्या समोरील सिग्नल मार्गे मुंब्राकडे जाणारी सर्व वाहने खारघर पांडव मार्ग, तळोजा मध्यवर्ती कारागृहासमोरून खारघर हिरानंदानी मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवस-रात्र वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नेमण्यात आलेल्या ट्रॅफिक वार्डनमुळे तळोजा आणि खारघर वाहतूक पोलिसांवरील कामाचा ताण काहीसा हलका झाला आहे. विशेष म्हणजे नेमणूक करण्यात आलेल्या वॉर्डनला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या वॉर्डनला प्रशिक्षण देणे आवश्यक आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
----------------------------------------------
मुंब्रा बायपास रेतीबंदरजवळील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे खारघरमधून हिरानंदानी मार्गे वाहने वळवण्यात आली आहेत. सध्या खारघरमध्ये सहा वॉर्डन कार्यरत आहेत.
- योगेश गावडे, अधिकारी, वाहतूक शाखा, खारघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com