वाढदिवसाच्या पार्टीत भांवंडाकडून तरुणाची हत्या

वाढदिवसाच्या पार्टीत भांवंडाकडून तरुणाची हत्या

दिवा, ता. १० (बातमीदार) : मुंब्रा येथे मित्राच्या वाढदिवसाच्या दारू पार्टीत झालेल्या वादातून दोन भावंडांनी तरुणाची हत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ८) घडली आहे. उदय कदम असे मृताचे नाव असून, मुंब्रा पोलिसांनी सिद्धेश शेडगे व संकेत शेडगे या दोघांना अटक केली आहे. या दोन्ही भावांवर याआधीही गुन्हा दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मुंब्रा येथील ठाकूर पाडा परिसरात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या वेळी ७ ते ८ जण मद्यपान करत असताना शाब्दिक वाद झाला. या वेळी मद्यधुंद अवस्थेत उदय कदमचे सिद्धेश व संकेतशी भांडण सुरू झाले. हा वाद विकोपाला जाऊन दोघांनी स्वतःजवळील धारदार शस्त्र काढून उदयवर हल्ला केला. जखमी अवस्थेत उदयला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com