लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात !

लाचखोर नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात !

ठाणे, ता. १० (वार्ताहर) : ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे एक लाख ४२ हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत विभागाने आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास रंगेहात अटक केली. वासुदेव पवार (५७) असे या नायब तहसीलदाराचे नाव आहे.

शेत पिकाऊ जमिनीला बिनशेती वर्गात रूपांतरीत करण्यासाठी तक्रारदाराला सरकारी शुल्काव्यतिरिक्त लाच म्हणून एक लाख ४२ हजारांची मागणी करीत सोमवारी (१० एप्रिल) रोजी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास रक्कम घेताना रंगेहात लाचलुचपत खात्याच्या पथकाने नायब तहसीलदार वासुदेव बिसन पवार (५७) यांना अटक केली. ३३ वर्षीय तक्रारदार हे ठाणे तहसीलदार कार्यालयात मित्राची शेतजमीन बिनशेती करण्यासाठी आले होते. त्यांना नायब तहसीलदार पवार यांनी सरकारी शुल्काव्यतिरिक्त एक लाख ४२ हजार रुपयांची स्वतःसाठी आणि अन्य लोकसेवकांकरिता लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत विभागाकडे नोंदवली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून शासकीय विश्रामगृह येथे लाचेची १ लाख ४२ हजार रुपये रक्कम स्वीकरताना पवार यांना अटक केली. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com