फ्यूचर रिटेलच्या खरेदीसाठी रिलायन्ससह ४९ कंपन्या इच्छूक

फ्यूचर रिटेलच्या खरेदीसाठी रिलायन्ससह ४९ कंपन्या इच्छूक

मुंबई, ता. १० : बिग बझार या ब्रँडची मालकी असलेली ‘फ्यूचर रिटेल’ कंपनी खरेदी करण्यासाठी रिलायन्स रिटेल, जिंदाल पॉवर लि., सहारा एंटरप्रायझेस आदी ४९ कंपन्यांनी इच्छा दर्शवली आहे. ही कंपनी सध्या कर्जबाजारी झाली असून, दिवाळखोरी जाहीर करण्याच्या कार्यवाहीत आहे. ‘फ्यूचर रिटेल’ची खरेदी करण्यासाठी या कंपन्यांनी प्रस्ताव (इन्व्हिटेशन ऑफ इंटरेस्ट- ईओआय) सादर केले असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली. या वृत्तामुळे आजच्या व्यवहारात फ्युचर रिटेलचे शेअर ४.१७ टक्क्यांनी वधारले आणि त्यांना अप्पर सर्किटही लागले. कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक किशोर बियाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा गेल्या महिन्यात मागे घेतला असल्याचेही कंपनीने सांगितले. ‘फ्यूचर रिटेल’च्या कर्जदारांनी नव्या निविदा मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि एप्रिल मून रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ही अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि फ्लेमिंगो ग्रुप यांची संयुक्त कंपनी आहे. या कंपन्यांनी आपले प्रस्ताव पुन्हा सादर केले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सेंच्युरी कॉपर कॉर्प, ग्रीनटेक वर्ल्डवाइड, हर्षवर्धन रेड्डी, जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, पिनॅकल एअर प्रायव्हेट लिमिटेड, युनिव्हर्सल असोसिएट्स आणि डब्ल्यूएचएसमिथ ट्रॅव्हल लिमिटेड यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com