१३ लाखांची रोकड असलेली बॅग चोरीला

१३ लाखांची रोकड असलेली बॅग चोरीला

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : जिप्सम बोर्ड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मालकाने कार्यालयातील टेबलच्या कप्प्यात ठेवलेली १३ लाखांची रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. मोहमद उस्मान हारुण शेख यांनी ३० मार्च रोजी १३ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग ऑफिसमध्ये काम करणारा मोहमद शाहिद खान या कामगाराकडे दिली. त्यानंतर सदर रोख रक्कम असलेली बॅग मोहमद शेखने ऑफिसमधील टेबलच्या कप्प्यात ठेवून ते एका पार्टीस माल दाखवण्याकरिता गोडावूनमध्ये गेले असता ती बॅग कामगार मोहमद खानने हातचलाखीने चोरून नेल्याची तक्रार शांतिनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. के. म्हात्रे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com