कोर्लईच्या माजी सरपंचाला अटक

कोर्लईच्या माजी सरपंचाला अटक

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १० : उद्धव ठाकरे यांच्या मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आज पहिली अटक झाली. कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्ररीवरून २४ फेब्रुवारीला रेवदंडा पोलिस ठाण्यात ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, अधिकाराचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांच्यासह तत्कालीन ग्रामसेवक देवंगणा वेटकोळी, विनोद मिंजे, वेदिका म्हात्रे यांच्यासह तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्ह्यायातील पहिली अटक सोमवारी झाल्याच्या वृत्ताला या प्रकरणाचे तपास अधिकारी मुरूड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश सकपाळ यांनीही दुजोरा दिला. या अटकेसंदर्भात पोलिस प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com