घणसोलीत गतीरोधक लावण्याची मागणी

घणसोलीत गतीरोधक लावण्याची मागणी

घणसोली, ता. २२ (बातमीदार) ः घणसोली कौलआळी पश्चिम प्रवेशद्वाराच्या समोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहनांनी ये-जा सुरू असते. रस्त्यात गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. भविष्यातसुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

घणसोली-कौलआळी पश्चिम प्रवेशद्वारासमोरील मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहने नेहमी वेगाने धावत असतात. घणसोली गावातील आणि कौलआळीमधील वाहनेदेखील याच प्रवेशद्वारातून मुख्य रस्त्यावर येत असतात. या मुख्य रस्त्यावर कौलआळी पश्चिम प्रवेशद्वाराच्या बस डेपोकडील बाजूला गतिरोधक आहे. त्यामुळे बसडेपोच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनांचा वेग नियंत्रित होतो, परंतु दुसऱ्या बाजूस गतिरोधक नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या मैदानाच्या दिशेने येणारी वाहने नेहमीच भरधाव वेगाने येतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. यापूर्वी काही अपघात घडलेदेखील आहेत. तसेच या प्रवेशद्वारावर लागूनच रिक्षा स्टॅण्ड असल्याने तेथे उभ्या असलेल्या रिक्षा, बाहेर पडणाऱ्या वाहनांना मुख्य रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत नाही, यामुळेही अपघात घडतात. या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावे आणि भविष्यातील धोका टाळावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
--
या ठिकाणी वाहनांची वर्दळ असून वारंवार छोटेमोठे अपघात होतात. घणसोली गाव विकसित करण्यात महापालिका मागे पडत आहे. महापालिकेने ही समस्या गंभीरतेने घेऊन यावर कार्यवाही करावी.
- साईदास पाटील, ग्रामस्थ
---
वाहनांचा वेग या मार्गावर जास्त असून या ठिकाणी दुतर्फा वाहने येतात. त्यामुळे अनेकदा अपघात होतो. यावर नियंत्रण राहावे यासाठी विभाग अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मोठी दुर्घटना होण्याअगोदर याकडे लक्ष द्यावे.
- अजित शंकर गायकर, आगरी सेना, घणसोली विभागप्रमुख
--
घणसोली कौलआळी पश्चिम प्रवेशद्वाराच्या समोर मुख्य रस्त्यावर गतिरोधक लावण्यासंदर्भात निवेदन आल्यास विचार करू.
- रमेश गुरव, अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com