प्रशिक्षित शेजाऱ्याने दिलेल्या सीपीआरमुळे जीवदान

प्रशिक्षित शेजाऱ्याने दिलेल्या सीपीआरमुळे जीवदान

हृदयविकाराच्या झटक्यानंतरही वृद्ध सुखरूप
शेजारी राहणाऱ्या महिलेच्या ‘सीपीआर’मुळे वाचला जीव
मुंबई, ता. २२ : हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका ७४ वर्षीय व्यक्तीवर योग्य वेळी सीपीआर उपचार झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने तब्बल ४० मिनिटे त्याला सीपीआर दिल्यामुळे त्याचा जीव वाचू शकला. सीपीआरनंतर संबंधित वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात वेळीच उपचार मिळाले.
शशिकांत दवे काही दिवसांपूर्वी घरीच अचानक जमिनीवर कोसळले. त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवत होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ६२ वर्षीय हर्षा भगत परिचारिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी अनेक वर्षे सीपीआर प्रक्रियेत काम केले आहे. दवे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सीपीआर दिला. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले.
हृदयाचा तीव्र झटका आलेल्या ९० टक्के रुग्णांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो. जे रुग्ण वाचतात त्यांचे न्यूरोलॉजिकल नुकसान होते. कारण मेंदूच्या पेशी तीन मिनिटांच्या आत मरतात. अशा वेळेस सीपीआर महत्त्वाचे असते. तात्काळ मिळालेल्या सीपीआरमुळे रुग्णाचे प्राण वाचले. रुग्णाच्या हृदयाकडील एक धमनी ८५-९० टक्के दबली गेलेली आहे. रुग्णाला कार्डियाक कॅथेटेरायझेशन लॅबमध्ये नेऊन हृदयातील पूर्णपणे बंद पडलेली धमनी उघडण्यात आली. रक्ताच्या गुठळ्या काढून टाकण्यात आल्या. काही दिवसांतच रुग्ण बरा झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.

असा द्या सीपीआर!
- टीवायआर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी सांगितले, की तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे हृदय अनेकदा बंद पडते. अशा वेळी हृदयाला पम्पिंग करून ते पुन्हा सुरू केले जाते. त्याला सीपीआर म्हणतात.
- सीपीआर देण्यासाठी रुग्णाला एका सपाट पृष्ठभागावर ठेवावे. त्याचे तोंड एका बाजूला वळवावे. जीभ मागे पडणार नाही याची खात्री करा. सीपीआर करणारी व्यक्ती रुग्णाच्या बाजूला गुडघे टेकून आपली बोटे जोडते. स्वतःचे दोन्ही हात हृदयावरील हाडावर १००-१२० वेळा दाबते.
- सीपीआरदरम्यान कधी-कधी तोंडाने कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो. रुग्णालयाच्या बाहेर नॉन-मेडिकल व्यक्तीद्वारे दिले जाणारे सीपीआर हृदयविकाराच्या झटक्यातून एखाद्याला वाचवण्याची गुरुकिल्ली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com