वसई एपीएमसीसाठी १९ उमेदवार रिंगणात

वसई एपीएमसीसाठी १९ उमेदवार रिंगणात

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये ११ जागांसाठी १९ उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीपूर्वी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात पाच जागा बहुजन; तर एक जागा विरोधी पॅनेलला मिळाली आहे.
वसई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला रंगत येऊ लागली आहे. १९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत निवडणुकीपूर्वी सहा जागा बिनविरोध आल्या आहेत. यात ५ जागा बहुजन विकास आघाडीला मिळाल्या आहेत; तर एक जागा विरोधी पॅनेलला मिळाली आहे. बिनविरोध आलेल्या जागांमध्ये व्यापारी मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे विमलकुमार अंबानी आणि सुनील सरवैया, भटक्या विमुक्तमधून आनंद वडे, दुर्बल घटकांमधून संजय घरत आणि महिलांमध्ये भारती पाटील या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत; तर श्वेता पाटील या विरोधी पॅनेलमधून बिनविरोध आल्या आहेत. सर्वसाधारण सेवा सोसायटीच्या सात जागांसाठी ११ उमेदवार, ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार, सेवा सहकारी संस्थांच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आणि ग्रामपंचायत अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार उभे राहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com