जितेंद्र भोपळे यांचा हिरोजी इंदुलकर क्षेत्रीय पुरस्काराने गौरव

जितेंद्र भोपळे यांचा हिरोजी इंदुलकर क्षेत्रीय पुरस्काराने गौरव

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : नगरविकास दिनानिमित्त नगर विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार’ नगर रचना विभागाचे कोकण विभागाचे सहसंचालक जितेंद्र लक्ष्मण भोपळे यांना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एनसीपीए येथे हा सोहळा पार पडला. या वेळी मंत्रालय (खुद्द) ५ आणि क्षेत्रीय स्तर (तांत्रिक) १७ व क्षेत्रीय स्तर(अतांत्रिक संवर्ग) ८ असे एकूण ३० पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्य सरकारने अनेक विकास प्रकल्पांना गती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहराविषयी आस्था व जिव्हाळा ठेवून काम केले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरस्कार वितरणप्रसंगी म्हणाले. कोकण विभागाचे सह संचालक जितेंद्र भोपळे यांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात विधिमंडळ, आयटीपीशी, प्रादेशिक योजनेमधील आरेखनातील दुरुस्ती आदी ९६ प्रकरणांमध्ये केलेली कार्यवाही, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील विविध कलमांतर्गत २० प्रकरणांत शासनास मुदतीआधी सादर केलेले अहवाल, विविध न्यायालयीन प्रकरणांचा केलेला पाठपुरावा, कोकण विभागातील एकूण १४ नवीन नगर परिषदा, नगरपंचायती, बिगर नगर परिषदा क्षेत्रातील विकास योजना जीआयएस प्रणालीद्वारे तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम पार पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com