दहावीच्याविद्यार्थ्यांसाठी निःशुल्क  वर्ग

दहावीच्याविद्यार्थ्यांसाठी निःशुल्क वर्ग

खारघर ता. २२ (बातमीदार) : येथील सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेन्शियल हायस्कूलने राजमाता जिजाऊ शैक्षणिक सबलीकरण योजना या उपक्रमाच्या माध्यमातून दहावीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिने मोफत उन्हाळी विशेष शिकवणी वर्गाचे आयोजन केले आहे. यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाणार आहे. तेव्हा गरजू व इच्छुकांनी विद्यार्थांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेन्शियल हायस्कूलच्या महाराष्ट्र बोर्डाच्या सिद्धार्थ हायस्कूल आणि सीबीएसईच्या अजिंठा स्कूलमध्ये नववी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक सबलीकरण योजना राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सहावी वी ते नववी वर्गात गणित, इंग्रजी व सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयात कमकुवत तथा आभ्यासात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षकांकडून १ मे ३० जून या कालावधीत मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन केले आहे. तसेच, मुंबई महानगर प्रदेशातील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील तथा खारघरपासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सम्राट अशोक हॉस्टेल फॉर ईड्ब्ल्यूएस आणि यशोधरा मुलीच्या हॉस्टेलमध्ये संस्थेच्या वतीने निशुल्क राहण्याची व भोजनाची निशुल्क सोय करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी दिली. गरजू व इच्छुकांनी satyagrahacollege@yahoo. Com या संकेतस्थळावर नाव नोंदवावे अथवा सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेन्शल हायस्कूल, सुप्पारक भवन, प्लॉट नं ५२ सेक्टर१९ खारघर, नवी मुंबई येथे प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन करण्यातत आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com