भिवंडीत दुचाकीसह रिक्षाची चोरी

भिवंडीत दुचाकीसह रिक्षाची चोरी
Published on

भिवंडी (बातमीदार) : शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच दुचाकीसह रिक्षा चोरीला गेली आहे. या वाहनचोरीच्या घटनांची नोंद दोन पोलिस ठाण्यात आहे. पहिल्या घटनेत लड्डानअली मोहमद अली शेख (वय ४५) यांनी एमएच ०४ एफएन ०८२९ ही दुचाकी नदियापार, पिराणीपाडा येथील इंडिया हॉटेलच्या पाठीमागे १८ एप्रिल रोजी पार्क करून ठेवली असता अज्ञाताने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शांतिनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुसऱ्या घटनेत रमेश आश्रोबा वाघमारे (वय ४८) या रिक्षाचालकाने त्याची एमएच ०४ जीएन १६६८ या क्रमांकाची रिक्षा चांदतारा मशीद परिसरातील पिली हायस्कूलच्या पाठीमागे सोनार दुकानासमोर १६ एप्रिल रोजी पार्क करून ठेवली असता चोरट्याने नेली आहे. या रिक्षाचोरीचा अज्ञाताविरोधात निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com