सक्षम २०२३ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

सक्षम २०२३ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

ठाणे : पर्यावरण संरक्षण, ऊर्जा सुरक्षा व शाश्वत विकासासाठी, तसेच पेट्रोलियम उत्पादनाच्या संवर्धन जनजागृतीसाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या वतीने २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत सक्षम २०२३ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत ऊर्जा संरक्षण व पेट्रोलियम उत्पादनाच्या संवर्धनासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेच्या वतीने सक्षम २०२३ अंतर्गत राज्यस्तरीय कार्यक्रम २४ एप्रिल रोजी अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. केंद्र सरकारने संरक्षण क्षमता महोत्सव अर्थात सक्षम २०२३ हा कार्यक्रम सुरू केला असून या वर्षी ‘नेट झीरोच्या दिशेने ऊर्जा संरक्षण’ हे घोषवाक्य घेऊन जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या कालावधीत एक हजारापेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह संभाषण, वादविवाद स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम वाहन चालवण्याची स्पर्धा आदींचा समावेश आहे. इंधन आणि तेल संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरवही करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com