सर्व इमारतींचे फायर ऑडिट तातडीने करा

सर्व इमारतींचे फायर ऑडिट तातडीने करा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : सिनेवंडर मॉलच्या शेजारी असलेली ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली भीषण आग विझविण्यासाठी ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल अपयशी ठरले होते. याप्रकरणी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांना पत्राद्वारे महापालिका परिसरातील सर्व इमारतींचे फायर ऑडिट आणि मॉक ड्रिल करण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे आग विझविण्यात त्यांना यश येत नव्हते. अग्निशमन दलाच्या ब्रँट्रो गाड्या असल्याने या गाड्यांसाठी एका वेळी तीन पाण्याच्या टँकरची आवश्यकता असते. परंतु अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ते शक्य होत नव्हते. ठाणे शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने जात असताना महापालिकेच्या अपुऱ्या यंत्रसामग्री व नियोजनाअभावी तसेच इमारतींना परवाना देतेवेळी अग्निशमन दलाने फायर ऑडिट न करता शहर विकास विभाग परवाना कसा देऊ शकते, यावर खासदार राजन विचारे यांनी संशय व्यक्त केला आहे.

अपघातास प्रशासन जबाबदार
एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी तुम्ही ठोस उपाययोजना राबवावी; अन्यथा एखादा अपघात घडल्यास प्रशासन जबाबदार असेल, असे खासदार राजन विचारे यांनी ठणकावून सांगितले. ठाणे पालिका परिसरात किती इमारतींचे फायर ऑडिट आतापर्यंत केले आहे याची माहिती, तसेच व्यापारी संकुल, हॉस्पिटल, मॉल, हॉटेल, तसेच दाट लोकवस्ती असलेल्या इमारतींचे फायर ऑडिट आणि मॉक ड्रिल करून घेण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com