कचऱ्यामुळे रोहित्राला आग

कचऱ्यामुळे रोहित्राला आग

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : विद्युत रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला शुक्रवारी (ता. २१) सकाळी आग लागल्याने डोंबिवलीतील काही भागाचा वीजपुरवठा विस्कळित झाल्याची घटना घडली. या आगीमुळे महावितरणचेही आर्थिक नुकसान झाले आहे; तर या वाहिनीवरील ग्राहकांना वीज नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला.

डोंबिवलीतील कस्तुरी प्लाझा येथे रोहित्राजवळ साठलेल्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात बाजीप्रभूकडून येणाऱ्या व डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड, नवापाडा, तसेच डोंबिवली पूर्वेतील नालंदा व तुकारामनगरकडे वीज वाहून नेणाऱ्या उच्चदाबाच्या वाहिन्या जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर नवापाडा वगळता इतर तीन भागांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने तातडीने सुरू करण्यात आला; तर दुरुस्ती सुरू असतानाच पर्यायी मार्ग उपलब्ध करून नवापाडा भागातील गणेश नगर, शंकेश्वर, कुंभारखाण पाडा, कुबेर समृद्धी, बावनचाळ, रेल्वे ग्राऊंड भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. संबंधित भागातील ग्राहकांनाही वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास झाला. त्यामुळे वीज वितरण यंत्रणांजवळ कचरा टाकू नये व असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना कळवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com