

पालघर, ता. २२ (बातमीदार) : पालघर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अडते व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या गटाची निवडणूक २८ एप्रिल रोजी होणार आहे. समितीच्या १७ जागांसाठी ६२ उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १५ जागांसमोर प्रतिस्पर्धी नसल्याने या १५ जागा बिनविरोध निवडून आल्या. यापैकी सेवा सहकारी संस्थांमधून ११; तर ग्रामपंचायत मतदारसंघातून चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. अडते व्यापारी मतदारसंघातील दोन जागांसाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक २८ एप्रिल रोजी होणार आहे. पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिल गावड व मविआ घटक पक्षातील पदाधिकारी यांनी केलेल्या समन्वयामुळे पालघर तालुका कृषी सहकार महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला आहे. विशेष म्हणजे शिंदे व भाजप गटाच्या एकाही उमेदवाराचा टिकाव येथे लागलेला नाही.
-----------------
डहाणूच्या सर्व जागा बिनविरोध
डहाणू तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. डहाणू तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांमध्ये चुरस होती. १७ जागांसाठी ३४ जणांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते; मात्र अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सतरा जागांवर कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने ही बाजार समिती संपूर्णतः बिनविरोध झाली. माजी आमदार आनंद ठाकूर यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी गणिताची जुळवाजुळव केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुतांश जागा बिनविरोध जिंकल्या आहेत; तर पंकज कोरे यांनी भाजपच्या काही जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.