चोरटे खैराचे लाकूड जप्त

चोरटे खैराचे लाकूड जप्त

वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात खैराच्या लाकडांची तस्करी करणारे काही लाकूड तस्कर आजही कार्यरत आहेत. अशाच तस्करांकडून जंगलातील तोड झालेल्या खैर लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो पडघा वनपरिक्षेत्राच्या वनाधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्‍यात घेतला. तालुक्यातील राऊत पाडा ते किरवली रस्त्यालगत खैराच्या लाकडाने भरलेला टेम्पो येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पडघा वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल किरवली एम. एल. शिंदे, वनपाल पडघा डी. बी. माळी, वनपाल वडपा पी. के. आव्हाड, वनरक्षक सी. पी. पोटे, एम. बी. पावरा, ए. ए. कुलकर्णी, एम. एन. आयलवड, वाहनचालक विकास उमतोल यांनी घटनास्थळी सापळा रचला असता संशयित टेम्पोमध्ये तीन घ.मी.चे ६५ खैर लाकडाचे ओंडके आढळून आले. दरम्यान, रात्री अंधाराचा फायदा घेऊन चालक घटनास्‍थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. या प्रकरणात वनाधिकाऱ्यांनी १० हजार रुपये किमतीचे खैराचे लाकूड व टेम्पो ताब्यात घेऊन फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com