५०० विद्यार्थी बनणार स्वच्छता दूत

५०० विद्यार्थी बनणार स्वच्छता दूत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेस दुसऱ्‍या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे मोहिमेतंर्गत शहरामध्ये युद्धपातळीवर काम सुरू असून ठाणे शहर सुंदर व स्वच्छ शहर दृष्टीस पडत आहे. मात्र ही मोहिम आणखी व्यापक व्हावी यासाठी आता शालेय विद्यार्थीही खारीचा वाटा उचलणार आहेत. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील ५०० विद्यार्थी यासाठी उन्हाळी सुट्टीत हे स्वच्छता दूत घरोघरी जाऊन कचरा वर्गीकरणाचे धडे देणार आहेत.
नगरविकास दिनानिमित्त नरिमन पाँईट, मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ठाणे महापालिका आणि आर. निसर्ग फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्‍याच्या वर्गीकरणाबाबत सादरीकरण केले. या सादरीकरणातून महात्मा गांधीजीच्या तीन माकडांनी दिलेल्या ‘बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा ना देखो’ या संदेशाचा आधार घेत स्वच्छतेबाबतही ‘सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कचरा’ असे वर्गीकरण करा असा संदेश देत असतानाच आपल्या घराप्रमाणे आपला परिसर व शहरही स्वच्छ ठेवले पाहिजे, अशी जनजागृती सादरीकरणाच्या माध्यमातून करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेवून या मोहिमेबद्दल अधिक माहिती देत संवाद साधला.
ओला कचऱ्‍यासाठी हिरव्या रंगाचा, सुका कचऱ्‍यासाठी निळ्या रंगाचा, व घरगुती घातक कचऱ्‍यासाठी काळा रंगाचा डबा वापरावा हे विद्यार्थ्यांनी विषद केले. यावेळी आयुक्त बांगर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार, आर. निसर्ग फाऊंडेशनच्या डॉ. लता घनश्यामनानी, सुलोचना सिंघानिया शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
....
समाजात सकारात्मक बदल
श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या जनजागृतीची सुरूवात निश्चितच त्यांच्या स्वत:च्या घरापासून होण्यास मदत होईलच त्यामुळे समाजात देखील सकारात्मक बदल नक्कीच घडेल. तसेच युवा पिढीच्या माध्यमातून होणारा बदल हा स्वच्छ वातावरण, निरोगी जीवन व पर्यावरणाचे रक्षण करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी आर. निसर्ग फाऊंडेनने व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com