कारची काच फोडुन रोखीसह ऐवजांची चोरी

कारची काच फोडुन रोखीसह ऐवजांची चोरी

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील लॅपटॉपसह रोख रक्कम चोरण्याच्या घटनांत वाढ होत आहे. अज्ञात चोरट्यांनी १९ एप्रिल रोजी एका दिवसामध्ये सीबीडी आणि नेरूळ भागात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील रोख रक्कम आणि लॅपटॉप चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवली येथील कासाबेला वसाहतीत राहणारे रंजीत यादव (वय ४०) हे व्यावसायिक १९ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास सीबीडी सेक्टर-१९ मधील एम स्क्वेअर बिल्डिंगमध्ये कामानिमित्त आले होते. त्या वेळी त्यांनी आपली टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर कार समोरील रस्त्यावर उभी करून ते काही वेळ मीटिंगसाठी गेले होते. याचदरम्यान चोरट्याने कारची पाठीमागील खिडकीची काच तोडून ५० हजारांची रोख रक्कम असलेली लेदर बॅग, तसेच एक लाख रुपये किमतीचा लॅपटॉप असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. नेरूळमध्ये त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्‍याच्या सुमारास घडलेल्या दुसऱ्या घटनेत मेहुल पवार हे एलआयसी एजंट ऐरोली येथून मित्रासह नेरूळमध्ये गेले होते. या वेळी मेहुलने कार नेरूळ सेक्टर-१७ मधील माया अकादमीसमोरील रस्त्यावर पार्क केली होती. त्यानंतर तिघेही खरेदीसाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने मेहुल पवार यांच्या कारची पाठीमागील काच फोडून त्यातील लिनोवो कंपनीचा टॅब असलेली बॅग, विविध बँकेचे क्रेडिट कार्ड, आधार कार्ड व इतर कागदपत्रे असलेली काळ्या रंगाची ऑफिस बॅग चोरून नेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com