उरणमध्ये नमाजींची मोठी संख्या

उरणमध्ये नमाजींची मोठी संख्या

उरण, ता. २२ (बातमीदार) :- उरणमध्ये ईद साजरी करण्यासाठी शनिवारी मोठ्या संख्येने मुस्लिमधर्मीय भाविक जमले होते. उरण येथील जामा मशिदीत सकाळी पहिली नमाज पठण करताना १६०० भाविक उपस्थित होते. तर दुसरी नमाज पठण करताना ८०० भाविक उपस्थित होते. मदरसा ए मेहमुदीया (मौलाना मोसिम कली) खिडकोळी नाका उरण येथे सकाळी पहिली नमाज पठणासाठी ३०० ते ३५० मुस्लिम भाविक उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे.

खाजा गरीब नवाज सुन्नी हनफी मदरसा बालई रोड (मुहम्मद जफर), मोरा फड नंबर ५ येथील रेल्वे बांधावरील दर्गा, मांगीरदेवसमोरील मदरसा, भवरा येथे शेकडो भाविकांनी नमाज अदा केली. बोरी नाका भंगारवाले यांनी बाधलेल्या मशिदीचे काम गेल्यावर्षीपासून पोलिसांनी थांबविले आहे. शंक्कर पिर येथे नमाज पठण केली जात नाही. डोंगरावरती असल्यामुळे नमाजी तेथे जात नाहीत. पिरवाडी दर्गा येथेही नमाज पठण केली जात नाही. फक्त फिरण्यासाठी मुंबई ठाणे, कौस्सा, मुब्रा येथून मुस्लिम बांधव फिरण्यासाठी येथे येत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com