हुतात्म्यांच्या मुलींना लॅपटॉप

हुतात्म्यांच्या मुलींना लॅपटॉप

बोरिवलीच्या संरक्षण प्रदर्शनात
हुतात्म्यांच्या मुलींना लॅपटॉप
मुंबई, ता. २२ ः देशातील युवा शक्तीमध्ये देशभक्तीची भावना जागवली तर वेळ व्यर्थ न घालवता ते देशासाठी कार्य करतील आणि देश प्रगतीपथावर जाईल, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. बोरिवलीतील कोरा केंद्र मैदानावर सुरू झालेल्या दोन दिवसीय संरक्षण प्रदर्शनाचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते. अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या संकल्पनेतून व सैन्यदलांच्या सहकार्याने प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनामध्ये भारताची संरक्षण सिद्धता दाखवणारी युद्धसामुग्री व उपकरणे ठेवण्यात आली आहेत. अर्थव फाऊंडेशनच्या वतीने हुतात्मा सैनिकांच्या मुलींना लॅपटॉप देण्यात आले. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली पाहिजे. त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित करायला हवे, असे राज्यपाल बैस म्हणाले. भव्य संरक्षण प्रदर्शन आयोजित करून युद्धकथा कथन, जवानांच्या साहस कथा आणि तज्ज्ञ लष्करी अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून सैन्य दलांमध्ये भरती होण्यास युवकांना प्रेरित करीत असल्याबद्दल राज्यपालांनी अथर्व फाऊंडेशनचे कौतुक केले. देशाला शिस्तीची गरज आहे, असे नमूद करून आपले घर, परिसर, कार्यस्थळ व स्वच्छ ठेवणे तसेच वीज व पाण्याची नासाडी थांबवणे ही देखील देशसेवाच असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com