सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची बैठक उत्साहात

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची बैठक उत्साहात

बोर्डी, ता. २२ (बातमीदार) : सेवानिवृत्त कर्मचारी उपविभागीय संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा कै. गजीताई सभागृह बोर्डी येथे संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र चुरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू तालुका निवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे, डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, घोलवडचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शारदा राऊत व भगिनींनी ईशस्तवनाने केली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक दिनकर राऊत यांनी केले. वार्षिक सभेचे इतिवृत्त संघटनेचे सचिव किरीट पटेल यांनी केले. या वेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्यांचा सत्कार, विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा व शारदा राऊत यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेतला. गणेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री सावे यांनी अहवालवाचन केले. जगदीश राऊत यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com