
कल्याणमध्ये कचऱ्याच्या डब्यांचे वाटप
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : शहरात ओला सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक असून गल्ली बोळामधील कचरा कुंड्या मुक्त झाल्याने नागरिकांना कचरा टाकण्यात अडचण येत असल्याने कल्याण पश्चिममधील माजी नगरसेवक मोहन उगले यांनी आपल्या प्रभागात स्वच्छ परिसरासाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कचऱ्याच्या डब्यांचे वाटप करत अभिनव उपक्रम राबवला आहे. राज्य शासनाकडून नुकताच केडीएमसीला स्वच्छतेसाठी १० कोटी रुपयांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारात कचरा वर्गीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ओला आणि सुका कचऱ्याच्या डब्यांचा मोलाचा सहभाग असल्याची माहिती माजी नगरसेवक मोहन उगले यांनी दिली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विभागीय शिवसेना शाखा ठाणकर पाड्याच्या वतीने स्वच्छ परिसर राखण्यासाठी गृहसंकुलांना कचऱ्याच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी छाया वाघमारे, नेत्रा उगले, सुनिता मोरे, अर्चना आव्हाड, मोहन उगले, अनंता पगार, स्वप्नील मोरे, प्रदीप दिवेकर, नितीन कदम, शरद आव्हाड, धर्मेंद्र सिंग भदोरिया, पिंटू दुबे, कैलास नागरे, उमेश भुजबळ, समीर पायले, गणेश कुंभारकर, जय पालेकर तसेच समस्त शिवसैनिक, महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.