युवा ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

युवा ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

वसई, ता. २९ (बातमीदार) : आज सर्वत्र डिजिटल व्यवहार हाताळले जात आहेत. तरुण मंडळींचा कल याकडे अधिक आहे. बँकेतून मिळणाऱ्या सुविधा अत्याधुनिक असाव्यात व युवा ग्राहकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यामानाने प्रयत्न केले जात असल्याची माहिती बॅसीन कॅथॉलिक बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस यांनी दिली.
बॅसीन कॅथॉलिक बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन वसईत करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सेठ, प्रभारी व्यवस्थापक सिक्स्टो फरगोज, अध्यक्ष रायन फर्नांडिस, उपाध्यक्ष सायमन सवारीस, ओनील आल्मेडा यांच्यासह बँकेचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते. नवीन सीबीएस कार्यप्रणालीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार करता येणार असल्याचे संदीप सेठ यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतील ६३ शाखा व १ विस्तार कक्षामधून ९० हजार सभासदांना आणि पाच लाख ग्राहकांना बँकींग सेवा देत आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेची एकूण सभासद संख्या ९८०२४, मिश्रव्यवसाय १२,७०० कोटी व एकूण कर्जे ४,५५३ कोटी वितरित करण्यात आली आहेत. बँकेच्या ठेवी ८,१५९ कोटी इतक्या असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com