आता ग्रामीण भागात ही आपला दवाखाना

आता ग्रामीण भागात ही आपला दवाखाना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या ग्रामीण भागांसह ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १ मेपासून कार्यान्वित होत आहे. दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत हा दवाखाना सुरू राहणार असून ही बाह्य रुग्णसेवा असणार आहे. त्याशिवाय येथे येणाऱ्यांना मोफत औषधे आणि तपासणीही मोफत केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १ मे २०२३ रोजीपासून कार्यरत होणार आहे. ग्रामीण भागात, शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे, नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्ट्यांतील सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहे. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरिता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातील भेरे नगर, अंबरनाथ तालुक्यातील राहुल नगर आणि मुरबाड तालुक्यातील संभाजी नगर मुरबाड तसेच महापालिका क्षेत्रातील मिळून ९ ठिकाणी आपला दवाखाना सुरू होणार आहे.

विविध सेवा
आपला दवाखानाअंतर्गत बाह्य रुग्ण सेवा वेळ दुपारी २ ते रात्री १० पर्यंत, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी व लसीकरण तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्ततपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आवश्यकतेनुसार व विशेष तज्ज्ञ संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com