कल्याण-बदलापूर तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला वेग

कल्याण-बदलापूर तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला वेग

कल्याण, ता. २९ (बातमीदार) : कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरा, चौथा रेल्वे मार्ग आणि चिखलोली येथील नियोजित रेल्वे स्थानक, त्याच्या परिसरातील जमिनी देणाऱ्या शेतकरी व भूखंडमालकांसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमआरव्हीसी) सुमारे १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्हासनगर प्रांत (उपविभागीय) अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या कामांना आता वेग येणार आहे.

कल्याण-बदलापूरदरम्यान तिसरा व चौथ्या रेल्वेमार्गासाठी कुळगाव, मोरिवली, चिखलोली, खुंटवली, कात्रप आणि बेलवली येथील शेतकरी व भूखंडमालकांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. अंबरनाथ-चिखलोलीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वेस्थानकासाठी परिसरातील जमीन अधिग्रहित करण्यात आली होती; मात्र या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. यासंदर्भात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा केला जात होता. यासंदर्भात त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, ‘एमआरव्हीसी’ने चिखलोली स्थानक व परिसरातील जमिनीसाठी ८९ कोटी ४३ लाख; तर कल्याण-बदलापूरदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी ४५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी वर्ग करण्यात आल्याने विकासकामांना वेग आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com