धानिवरीतील बाधितांना खासदारांकडून आर्थिक मदत

धानिवरीतील बाधितांना खासदारांकडून आर्थिक मदत

पालघर, ता. २९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद द्रुतगती महामार्गाचे काम सध्या सुरू असून या कामात धानिवरी येथे अनेक घरांचा अडथळा येत असल्याने प्रशासनाने येथे प्रचंड पोलिस बंदोबस्त लावून घरे पाडली होती. या वेळी बाधितांना मोबदला मिळाला नसल्याने येथील ग्रामस्थांनी विरोध केला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी येथे भेट दिली होती. या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले होते. याची दखल घेत खासदार राजेंद्र गावित यांनी बेघर कुटुंबांची भेट घेतली व त्यांना आर्थिक मदत केली. खासदार राजेंद्र गावित यांनी या वेळी बेघर झालेल्या कुटुंबांची व येथील ग्रामस्थांची भेट घेऊन या घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलिस प्रशासनाने केलेल्या अमानुष कारवाईबाबतीत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी खासदार गावित यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com