बोर्डीत ‘निरामय आरोग्य’ परिसंवाद उत्साहात

बोर्डीत ‘निरामय आरोग्य’ परिसंवाद उत्साहात

बोर्डी, ता. २९ (बातमीदार) : बोर्डी महिला नागरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून बोर्डी येथील गजीताई स्मारक सभागृहात ‘निरामय आरोग्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात २०० महिला व ४० पुरुषांनी सहभाग नोंदवला. नकारात्मक जीवनशैलीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा आजाराचे प्रमाण वाढते. या आजारातून मुक्त होण्यासाठी दैनंदिन जीवनात नियमित आहार, सकारात्मक विचारसरणी व तणावमुक्त वातावरणात वावरण्याची सवय करणे गरजेचे असल्याचे डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कार्यवाह रंजना राऊत, व्यवस्थापक अचला सावे यांच्यासह संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेच्या अध्यक्षा लतिका पाटील यांनी; तर सूत्रसंचालन व आभार दीपा पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com