सदृढ आरोग्यासाठी...चला आनंदपथावर

सदृढ आरोग्यासाठी...चला आनंदपथावर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : इतिहास जमा होत असलेली लगोरीचा थरार... कुठे पंजा लढवण्याची चढाओढ तर कुठे चित्रकारीतेत हरवलेले हळवे मन... सोबत गायन, वादन, ड्रम सर्कल, जिमनॅस्टिक असे चित्र रविवारपासून ठाण्याली सर्व्हिस रोडवर दिसणार आहे. ‘आपण सारे नाचू-गाऊ, योगा करू आणि आपले खेळ खेळूया’ या शिर्षकाअंतर्गत ठाण्याचा सर्व्हिस रोडवर ‘आनंद पथ’ हास्य ‘जत्रे’ने बहरणार आहे.
कोरोना महामारी नंतर संपूर्ण जग थांबले, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. यावर उपाय म्हणून ठाणे महापालिका, ठाणे पोलिस आयुक्तालय व माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेविका रुचिता मोरे यांच्या संकल्पनेतून ‘आनंदपथ’..रस्ता आरोग्याचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून ठाण्यातील पाचपाखाडी सर्व्हिस रोड व शेजारी असलेल्या उद्यानामध्ये दर रविवारी पहाटेपासून हा उपक्रम होणार आहे. यामध्ये विविध खेळ, साहित्य, कला, गायन, वादन असे विविध प्रकार सादर करण्यात येणार आहेत. तसेच ड्रम सर्कल, जिमनॅस्टिक, पंजा लढविणे, शिवकालीन स्केचिंग, दोरीच्या उड्या, मल्लखांब, क्रॉस फिट, मातीकाम, नृत्य होणार आहे.
हल्लीची मुले मोबाईल गेममध्ये रमली आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बॅटमिंटनसारखे काही मोजके खेळ सोडले तर मैदानी खेळापासून दुरावत चालली आहेत. त्यांना पुन्हा पारंपारिक खेळाकडे आकर्षित करण्यासाठी येऊर गावातील काही तरुण भोवरा, लगोरी, लेझीम सादर करणार आहे. यामध्ये नागरिकांना देखील सहभाग घेता येईल. या उपक्रमाचे उद्‌घाटन पोलिस आयुक्त जगजीत सिंग यांच्या हस्ते होणार आहे, असे राजेश मोरे यांनी सांगितले. हा उपक्रम ३० एप्रिल, ७ मे व १४ मे रोजी सकाळी ६.३० ते ८.३० यावेळेत होणार असून ठाणेकरांना यामध्ये सहभागी होऊन आनंद लुटता येणार आहे. गेल्यावर्षीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही उन्हाळ्याच्या सुटीत सहकुटुंब येऊन आनंदात वेळ घालवतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

वाहतूक मार्गात बदल
‘आनंद पथ, रस्ता आनंदाचा’ अर्थात ''हॅप्पी स्ट्रीट'' हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याने नियोजित दिवशी सकाळी ६.३० वा ते ८.३० वाजेपर्यंत या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलिस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
असे आहेत बदल
१) तीन हात नाका येथून सर्व्हिस रोडने नितीन कंपनीकडे जाणाऱ्‍या वाहनांना तीन हात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी ही वाहने तीन हात नाकाकडून हरिनिवास सर्कल मार्गे जातील.
२) नितीन कंपनी येथून सर्व्हिस रोडने तीन हात नाकाकडे जाणाऱ्‍या सर्व वाहनांना धर्मवीरनगर कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने धर्मवीरनगर कडून परमार्थ निकेतन रोड मार्गे पुढे जातील.
३) भक्ती मंदिर रोडने तीन हात नाका सर्व्हिस रोडकडे जाणाऱ्‍या वाहनांना सर्व्हिस रोड येथे प्रवेश बंद करण्यात आली असून ही सर्व वाहने प्रशांत कॉर्नर मार्गे पुढे जातील.
४) मोदी ह्युंदाई रोडने तीन हात नाका सर्व्हिस रोड कडे जाणाऱ्‍या वाहनांना सर्व्हिस रोड येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने पाचपाखाडी मार्गे जातील.
५) एचडीएफसी बँक कट रोडने तीन हात नाका सर्व्हिस रोडकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला असून येथील वाहने पाचपाखाडी मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com