ओरियन मॉलकडून ग्राहकांना सिंगापूर टूरची संधी

ओरियन मॉलकडून ग्राहकांना सिंगापूर टूरची संधी

नवीन पनवेल, ता. २९ (वार्ताहर) : पनवेलमधील ओरियन मॉलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त खरेदी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत विजेत्यास सिंगापूर टूर; तसेच ओला एस वन इलेक्ट्रिक बाइक जिंकण्याची संधी मिळणार आहे. याचा लकी ड्रॉ हास्यजत्रा फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते रविवारी (ता. ३०) संध्याकाळी ७ वाजता ओरियन मॉलमध्ये काढण्यात येणार आहे.
पनवेलमधील ग्राहकांची पहिली पसंती असलेले ओरियन मॉलच्या माध्यमातून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट व्हाउचर आणि इतर भेटवस्तूची जोड मिळत असते. यावर्षी ओरियन मॉल आपला सातवा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त मॉलच्या वतीने खरेदी स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेचा लकी ड्रॉ अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी ७ वाजता ओरियन मॉलमध्ये काढणार आहे. यामध्ये पहिल्या विजेताला सिंगापूर टूरची सुवर्णसंधी मिळणार आहे. तर दुसऱ्या विजेत्याला ओला एस वन इलेक्ट्रिक बाइक मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी या संधीचा फायदा घेऊन मॉलमध्ये भरपूर शॉपिंग करा आणि या स्पर्धेत सहभागी व्हा, असे आवाहन ओरियन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर व मनन परुळेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com