जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण

जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण

पालघर, ता. २९ (बातमीदार) : जिल्हा परिषद शाळांकडे सध्या विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. पाठ फिरवणारे विद्यार्थी शाळांमध्ये पुन्हा कसे येतील यासाठी शिक्षकांनी आपले कौशल्य पणाला लावावे व आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन करून सर्वांना अभिमान वाटेल असे शिक्षण जिल्हा परिषद शाळांमधून देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले.
शनिवारी (ता. २९) शाळेतील ‘पहिले पाऊल’ या उपक्रमांतर्गत शाळापूर्व तयारी मेळावा नगरपरिषद कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा नवली येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रकाश निकम बोलत होते. जिल्हा परिषद शाळेचे नाव कसे उंचावेल यासाठी शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. आपल्या मुलांनादेखील जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळांमध्ये दिले जाते हे सिद्ध करावे. जिल्हा परिषदेमार्फत शाळांमध्ये सर्व आधुनिक सेवा-सुविधा व चांगले शिक्षण देऊन शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, याची ग्वाही देऊन पालकांनादेखील आपल्या पाल्यांचा अभिमान वाटेल असे विद्यार्थी शाळेतून घडवू अशा भावना या वेळी प्रकाश निकम यांनी व्यक्त केल्या. या वेळी गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते, शिक्षण विस्तार अधिकारी संजय वाघ, नवली शाळेचे मुख्याध्यापक तसेच नवली केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

-----------------------
१२ आठवड्यांसाठी कृती कार्यक्रम
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना अभ्यासाची, शाळेची आवड निर्माण व्हावी व प्राथमिक कृती, कौशल्य पूर्ण व्हावे म्हणून संपूर्ण पालघर जिल्ह्यातील दोन हजार १३१ जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बालकांची शाळापूर्व तयारी अधिक उतम व्हावी हा उद्देश ठेवून राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील १२ आठवड्यांसाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे. १ मे ते १२ जून या सुट्यांच्या कालावधीमध्ये या बालकांची शाळेची पूर्वतयारी अधिक व्हावी यासाठी शाळा स्तरावर माता गट तयार केले जाणार आहे. या माता गटांमध्ये माता आपल्या बालकांच्या प्रत्येक आठवड्याला कृती घेणार आहेत. आठ आठवड्यांच्या कालावधीमध्ये या बालकांचा विकास केला जाणार आहे. जूनमध्ये दुसऱ्या मेळाव्यात बालकांची विविध क्षमता तपासणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com