सभेला गैरहजर राहिल्याने दोन ग्रामसेवक निलंबित

सभेला गैरहजर राहिल्याने दोन ग्रामसेवक निलंबित

Published on

मुरबाड, ता. २९ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आणि त्यासंबंधी खुलासा न करणाऱ्या मुरबाड तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी निलंबित केले आहे. बळेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कांताराम नाईगडे व टोकावडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जगदीश सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात आले आहे. मुरबाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी आदेश जारी केला. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनी आयोजित केलेल्या विशेष सभेस दोघे ग्रामसेवक उपस्थित राहिले नाहीत, तसेच त्याबाबत खुलासासुद्धा केला नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com