अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

पनवेल, ता. २९ (वार्ताहर) : नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच भागात राहणाऱ्या एका दहावर्षीय मुलीशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. संजय कारंडे (वय ४०) असे या व्यक्तीचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेतील पीडित मुलगी नवीन पनवेल भागात आई-वडिलांसह राहत आहे. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना पीडित मुलगी घरामध्ये एकटीच होती. ही संधी साधून त्या भागात राहणाऱ्या संजय कारंडे याने पीडित मुलीच्या घरात घुसून तिच्याशी अश्लिल चाळे केले. पीडित मुलीने आईला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर आईने खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी संजय कारंडे याच्याविरोधात विनयभंगासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com