Milapnagar Nature
Milapnagar NatureSakal

Dombivali News : मिलापनगर वासियांनी जपला निसर्ग; सुंदर बाग स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण संदेश

मिलापनगर परिसर म्हटले की डोंबिवलीतील हिरवागार परिसर असेच दृश्य आजही नजरेसमोर येते.
Summary

मिलापनगर परिसर म्हटले की डोंबिवलीतील हिरवागार परिसर असेच दृश्य आजही नजरेसमोर येते.

डोंबिवली - मिलापनगर परिसर म्हटले की डोंबिवलीतील हिरवागार परिसर असेच दृश्य आजही नजरेसमोर येते. येथील रहिवाशांनी परिसरातील वनराईची देखभाल तर केली आहेच, शिवाय घरातील बाग ही आकर्षक अशा वृक्षांनी बहरुन जोपासलेली आहे. हा परिसर झाडांच्या वैविध्यपूर्ण लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी नावाजलेला आहे. असे असताना पर्यावरण जागरुकता आणि निसर्गप्रेमी याची जोपासना करण्यासाठी यंदा मिलापनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन तर्फे सभासदांसाठी सुंदर बाग स्पर्धा आयोजित केली होती. दहा उत्कृष्ट सभासदांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मिलापनगर येथील असोसिएशनच्या सभासदांचे स्नेहसंमेलन शनिवारी पार पडले. असोसिएशनच्यावतीने यंदा सभासदांसाठी सुंदर बाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.पुरुषोत्तम काळे, डॉ.श्रेया भानप आणि डॉ.प्रल्हाद देशपांडे, प्रसाद कांत यांनी काम पाहिले. निकष नियमावलीत स्पर्धा न करता, कोणतीही तुलना न करता बागेतील वृक्षवल्लीवर करण्यात आलेले प्रेम पाहण्यात आले. स्पर्धा करण्यापेक्षा निसर्ग जोपासला जावा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपलाही हातभार असावा हाच यामागचा उद्देश असल्याचे यावेळी असोसिएशनकडून सांगण्यात आले.

दहा उत्कृष्ठ सभासदांना बागेची जोपासना आणि त्यात केलेली झाडांची लागवड इत्यादी पाहून त्यांना विविध झाडांची रोपे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आली. डॉ. प्रमोद बाहेकर, मनीष नाईक, डॉ. आशिष धडस, श्रीमती वर्षा महाडिक, मुकुंद कुलकर्णी, डॉ. हेमंत बावनेरकर, अरुण जोशी, स्वाती मुकुंद साबळे, मिलिंद जोशी, भारती मराठे या सर्वांना सुंदर बाग केल्या बद्दल गौरवण्यात आले.

यासोबतच एका डॉग शोचे देखील आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. यात पाळीव श्वान मालकांनी स्टेजवर येऊन आपल्या श्र्वानाची झलक दाखविली. डॉ. मंजुषा पवार, नागेश नायक, मुकूंद साबळे, अंकिता महाजन या उत्कृष्ठ अशा चार पाळीव श्वान मालकांना प्रशस्तीपत्रत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्र्वान सबंधी समज गैरसमज इत्यादी माहिती पशूवैद्यक डॉ. मनोहर अकोले यांनी दिली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com