पेठपाडा स्थानकाला मैदानांमुळे महत्त्व

पेठपाडा स्थानकाला मैदानांमुळे महत्त्व

खारघर, ता.१(बातमीदार): शहरातील कार्पोरेट पार्कसाठी सिडकोने जवळपास दीडशे एकर जागा राखीव ठेवली आहे. या पार्कच्या पहिल्या टप्यात सिडकोने १०.७ हेक्टर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे चार फुटबॉल स्टेडिअम उभारण्यात आले आहेत. तर हाकेच्या अंतरावर साडेतीन एकरवर रग्बीचे मैदान विकसित केले जाणार आहे. त्यामुळे खारघर कार्पोरेट पार्कच्या मध्यभागी असलेल्या पेठ पाडा मेट्रो स्थानकाला खेळाच्या मैदानांमुळे भविष्यात अधिक महत्त्व येणार आहे.
पेठपाडा मेट्रो स्थानकाला लागून एनएमआयएमएस मॅनेजमेंट महाविद्यालय, रामशेठ ठाकूर कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, बिडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूल तसेच ओवेपेठ आणि रांजणपाडा गाव आहे. तर काही अंतरावर ओवेगाव, सेक्टर तीस ते पस्तीस वसाहत आहे. ओवेपेठ आणि रांजणपाडा ग्रामस्थांना बाहेर जाण्यासाठी घरगुती वाहने अथवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. तर ओवेगाव, सेक्टर ३० ते ३५ वसाहतीमधील रहिवाशांना एनएमएमटी बस अथवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. खारघर रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना जवळपास शंभर रुपये मोजावे लागते. नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्यास परिसरातील रहिवासी आणि विद्यार्थ्यांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
----------------------------------
खारघर सेक्टर ३५ वरून खारघर रेल्वे स्थानकांवर रिक्षाभाड्यासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्यास पेठपाडा स्थानकांवर जाण्यासाठी तीस रुपये आणि तेथून बेलापूर अथवा खारघरसाठी वीस ते तीस रुपये मोजावे लागणार आहे. मात्र, मेट्रोमुळे नागरिकांचे वेळ आणि पैसे वाचणार आहे.
-अरविंद जाधव, रहिवासी, सेक्टर पस्तीस
----------------------------------------
पेठपाडा मेट्रो स्थानक हे सेक्टर ३४ पासून जवळ आहे. नागरिक पायी चालत जाऊन प्रवास करू शकतात. सिडकोने या महिन्यात मेट्रो सुरु करावी.
-राजाराम वायचळ, रहिवासी, सेक्टर ३४
--------------------------------------
ग्रामस्थांना बाहेर जाण्यासाठी प्रवासाचे कोणतेही साधन नाही. मेट्रोमुळे सोयीचे होणार आहे. स्थानकाला पेठपाडा ऐवजी पेठगाव हे नाव दिले असते, तर ग्रामस्थ समाधानी झाले असते.
-नरेश शेळके, ग्रामस्थ, पेठगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com