पाण्याच्या चोरीला पालिकेचा चाप

पाण्याच्या चोरीला पालिकेचा चाप

तुर्भे, ता. १ (बातमीदार): वीज चोरीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महावितरणने मागेल त्याला वीज जोडणीचे धोरण राबवले आहे. याच धर्तीवर आता नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेकायदा घरांना नळजोडणी देण्याचा निर्णय आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला असून या निर्णयामुळे पाण्याची चोरी (गळती) रोखण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. अशातच पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असल्याने प्रत्येक जण कोणत्याही प्रकारे ते मिळवत असतो. भलेही ती बेकायदा झोपडी असो वा स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बांधलेले कोट्यवधी रुपयांचे बंगले असोत. अनेकांनी घराजवळून गेलेल्या महापालिकेच्या जलवाहिनीतून बेकायदेशीरपणे पाणी घेतले आहे. महापालिकेने या जोडण्या वारंवार खंडित करण्याची मोहीम राबवली आहे. मात्र कारवाई केल्यानंतर पुन्हा संबंधित रहिवाशांकडून नळ जोडणी पुन्हा पूर्ववत करून पाणीचोरीचे प्रकार केले जात आहेत. त्यामुळे एकीकडे महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने महापालिकेने एक वर्षाकरीता अभय योजना राबवण्याचे निश्चित केले आहे. जेणेकरून जुन्या बेकायदा नळ जोडण्या नियमित (अधिकृत) न करता केवळ वापरलेल्या पाण्यावर देयक आकारण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे.
-----------------------------------------------
योजनेतील महत्त्वाचे मुद्दे
- बेकायदा पाणी वापर असलेल्या नळजोडणी धारकांकडून पाण्याचा वापर अधिभार अंतर्गत वापरलेल्या पाण्याचे देयक (प्रति मास) अधिक प्रशासकीय आकार (प्रति मास) याप्रमाणे पाणीदेयकाची आकारणी करण्यात येणार आहे.
- झोपडपट्टी, बैठीचाळ, इमारत यांना प्रतिमहिना १०० रुपये, उपाहारगृह, बार, बेकरी, सर्व्हिस सेंटर यांना २ हजार ८३० रुपये, किरकोळ दुकाने, लॉण्ड्री, मटण- मासे दुकान, चहा दुकान, फरसाण मार्ट यांना ४९० रुपये भरावे लागणार आहेत.
- घरगुती वापरासह दुकाने, भाजीपाला, टेलिफोन बूथ, किराणा दुकान, दवाखाना, वखार, गॅरेज, सलून यांना १९१ रुपये देयक भरावे लागणार आहे.
-----------------------------------------------------
या योजनेचा दिलेल्या मुदतीत लाभ न घेणाऱ्या बांधकामधारकांची बेकायदा नळ जोडणी खंडित करण्यात येणार आहे. तसेच सध्या चालू असलेल्या बेकायदा इमारतीस नळ जोडणी देण्यात येणार नाही.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com