उद्यानातील खेळण्यांची मोडतोड

उद्यानातील खेळण्यांची मोडतोड

जुईनगर, ता. १ (बातमीदार)ः नवी मुंबई शहरामध्ये पालिकेच्या वतीने आकर्षक उद्याने उभारण्यात आली आहेत. नेरूळ आणि जुईनगर विभागातील उद्यानांची हीच अवस्था असून देखभालीसाठी नेमलेल्या ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे शालेय सुट्टीचा हगांम वाया जात असल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.
जुईनगरमधील कृष्णा शाहीर पाटील उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, तसेच नेरूळ विभागातील छत्रपती शाहू महाराज उद्यान, नेरूळ सेक्टर २ मधील छत्रपती संभाजी राजे उद्यान, सेक्टर १२ कै. पंडित रामा भगत उद्यानासह इतर उद्यानांची खेळणी गायब झाली आहेत. नेरूळमधील मदर तेरेसा उद्यानातही अनेक खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, उद्यानातील मुलांसाठीच्या या खेळण्यांबाबत नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी केल्या जात आहेत, पण पालिकेने उद्यानांच्या देखभालीसाठी नेमलेले ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने सुट्टीचा हंगाम वाया जाण्याची हुरहूर मुलांना लागली आहे.
-----------------------------------------------
नवी मुंबई महापालिकेने फक्त स्वच्छतेवर भर दिला आहे, पण शहरातील उद्यानांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लहान मुलांनी खेळाचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सुनीता औटी, पालक
------------------------------------------------------
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी उद्यानात घेऊन येतो. मात्र, येथील खेळणी तुटलेली असतात. त्यामुळे मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही.
- मनीषा जोगे, पालक
---------------------------------------------------------
नेरूळ विभागातील मदर तेरेसा उद्यानात दुरुस्तीचे काम सुरू आहे. उद्यानात खेळण्यासाठीचा हत्ती हा खराब झाल्याने तो काढून ठेवण्यात आला आहे. त्याचा आकार खूप मोठा असून गाडी प्राप्त होताच तो योग्य ठिकाणी बसवण्यात येईल.
- दीपक रोहेकर, सहाय्यक उद्यान अधिकारी, नेरूळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com